लोटे-परशुराम एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत २६ जानेवारीला उपोषण

खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत अनेक रस्त्यांची फारच दुरवस्था झाली आहे. एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासोबत लोटे परशुराम इंड. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे यांनी वारंवार चर्चा, पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे उद्योजकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

एमआयडीसीतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याबाबत असोसिएशनने मागणी देखील केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत उद्योजकांमध्ये कमालीची नाराजी आहे.

पावसाळ्यानंतर दगड मातीने खड्डे बुजवायचे. थातुरमातूर काम करण्यात आली. परंतु पुन्हा त्या जागी नव्याने खड्डे पडलेले आहेत.

याबाबत विचारणा केली असता खड्डे बुजवणे आणि पॅचवर्कच्या कामाचे टेंडर मंजूर झाले असून, त्याची वर्कऑर्डर ठेकेदाराला दिली गेली आहे असे सांगण्यात आले परंतु अद्याप ते काम सुरू झालेले नाही.

याबाबत तहसीलदार, खेड यांच्याकडे सोमवारी असोसिएशन मार्फत निवेदन दिले असून, कामाला सुरुवात झाली नाही तर २६ जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार असल्याचे असोसिएशनमार्फत सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 15/Jan/2025