आ. किरण सामंत यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी
साखरपा : कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावरी चार एसटी गाड्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनमार्गे नेण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. आ. किरण सामंत यांनी यासाठी प्रयत्न केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिक प्रामुख्याने कोकणकन्या, मांडवी, तुतारी, जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांनी प्रवास करतात. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पाली, नाणीज, करंजारी, देवळे, दाभोळे, साखरपा, खडीकोळवण या ठिकाणी जाणारे अनेक प्रवासी असतात. त्यामुळे त्या ठिकाणाहून बसने जायचे झाल्यास अनेक वेळ स्थानकावर थांबावे लागत असे.
त्यामुळे ही समस्या साखरपा गावातील मुंबई राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यालय येथे कार्यरत असणारे प्रवीण वैद्य यांनी ही समस्या सोडविण्यासाठी लांजा राजापूर आमदार किरण (भैया) सामंत यांच्यासमवेत पत्रव्यवहार केला. त्यामुळे या समस्येची दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून ही समस्या मार्गी लावली आहे.
या निर्णयानंतर रत्नागिरी परिवहन नियंत्रक यांच्याकडून या वेळेत रत्नागिरी-कोल्हापूर गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन मार्गे वळविण्यात येणार असल्याचे पत्र काढण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
या निर्णयामुळे स्थानिक व चाकरमान्यांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले. याचबरोबर याची मागणी करणारे प्रवीण वैद्य यांचे देखील आभार मानण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 16/Jan/2025
