रत्नागिरी : ऑफ्रोह महिला आघाडीतर्फे कुवारबाव येथे १९ जानेवारीला महिला मेळावा

रत्नागिरी : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महिला आघाडी शाखा रत्नागिरीच्या वतीने कुवारबाव येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन व ऑफ्रोह महिला आघाडी-शाखा रत्नागिरीच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३.३० या वेळेत कुवारबाव जेष्ठ नागरिक संघ सभागृह, उत्कर्षनगर, कुवारबाव येथे हा मेळावा होईल.

ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्र हे मानवाधिकार संघटन असून कर्मचारी मनुष्यवर्ग व इतर घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. या महिला मेळाव्यात प्रबोधनात्मक व्याख्यान, हळदी- कुंकू कार्यक्रम व सर्वसाधारण सभा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला महावितरण रत्नागिरी परिमंडळच्या वरिष्ठ व्यवस्थापक (मानव ससाधन विभाग)/प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव ससाधरंण विभाग) सौ. प्रणाली निमजे, यांच्यासह आम आदमी पार्टी (आप), नवी मुंबईच्या उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या प्रिती शिंदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा सचिव कुळगाव बदलापूर प्रिया खडगी, केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मीरा कोलटेके आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व ऑफ्रोह महिला आघाडी, महाराष्ट्रच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा महिला मेळावा होणार आहे.

या मेळाव्याला ऑफ्रोह महिला आघाडी महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष प्रिया खापरे, सचिव नीता सोमवंशी, सहसचिव वनिता नंदनवार, कोषाध्यक्ष वंदू डेकाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेखा धकाते, आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, वेळंबच्या सरपंच समीक्षा बारगोडे, निवडीच्या सरपंच तन्वी कोकजे, पोमेडी बु.च्या सरपंच ममता जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी ऑफ्रोह साताराच्या महिला आघाडी पदाधिकारी राणी जाधव यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. ऑफ्रोह सातारा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली बेसके, रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री बंदरी, कोल्हापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगिता गोलाईत यांच्यासह ‘ऑफ्रोह’चे विविध पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला ऑफ्रोह सभासद व महिलांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन ऑफ्रोह महिला आघाडी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उषा पारशे, उपाध्यक्ष सुनंदा फुकट, सचिव स्वाती रोडे, कार्याध्यक्ष राजकन्या भांडे, ऑफ्रोह जिल्हाध्यक्ष व राज्य प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव किशोर रोडे, कार्याध्यक्ष बापुराव रोडे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 16/Jan/2025