चिपळूण : एसपीएम शाळेत १८ जानेवारीला जिल्हास्तरीय रोबोकॉन स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : स्काय रोबोटिक्सच्या वतीने शाळांसाठी जिल्हास्तरीय रोबोकॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परशुराम येथील एसपीएम इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये दि. १८ जानेवारी रोजी ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये जिल्हाभरातील शाळा आपले रोबोटस् या स्पर्धेत उतरविणार आहेत. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या रोबोटस्चे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत हे प्रदर्शन असेल व सायंकाळी ४ वा. बक्षीस वितरण समारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हाभरातील शालेय विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 16/Jan/2025