Budget 2025 : राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार

मुंबई : राज्यातील अर्थसंकल्पीय (Budget 2025) अधिवेशनाची सुरुवात ३ मार्चपासून होणार असून, १० मार्च रोजी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, या अधिवेशनादरम्यान राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण धोरणे आणि निर्णय घेतले जातील. अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.

राज्य सरकारने नागरिकांच्या अपेक्षांनुसार व्यापक आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करण्याचा निर्धार केला आहे. वाढत्या वित्तीय तुटीवर नियंत्रण मिळवणे, रोजगार निर्मिती, व समाजातील दुर्बल घटकांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारण्याची तयारी केली असून, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन व अर्थसंकल्प (Budget 2025) राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 17-01-2025