राजापूर : कुवेशी जिल्हा परिषद शाळेत सात वर्गांना एकच शिक्षक

राजापूर : तालुक्यातील कुवेशी येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा नं. १ मध्ये तब्बल ८० पटसंख्या असलेल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेमध्ये चार शिक्षकपदे मंजूर आहेत. सातत्याने शिक्षक गैरहजर, काहींची बदली आदी कारणांमुळे शिक्षकच उपलब्ध नसल्याने ८० पटसंख्या असलेल्या सात वर्गांना एका शिक्षकाला अध्यापन करावे लागत आहे. त्यातून, मुलांच्या शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाल्याने आक्रमक झालेल्या कुवेशी येथील पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी सरपंच मोनिका कांबळे यांच्यासमवेत पंचायत समितीला धडक दिली.

सातत्याने गैरहजर राहणारा शिक्षक अणि त्याच्या केवळ कारवाईचे आश्वासित करणारे त्यांचे वरिष्ठ यांस्यागर सत्काळ कारवाई करताना त्यांची शाळेवरून बदली करावी, अशी मागणी कुवेशी येथील पालकांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदनही पालक, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आले. शिक्षकांची अनुपस्थिती आणि मुलांची होणारी शैक्षणिक गैरसोय याकडे जगताप यांचे लक्ष वेधताना त्याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली.

गेल्या दोन वर्षामध्ये कमी शिक्षकसंख्येमुळे मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीमुळे शिक्षण विभागाला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून, जिल्हा परिषदेने कंत्राटी शिक्षक भरती करत अपुरा शिक्षकसंख्येचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र, कुवेशी येथील केंद्रशाळा नं. १ मध्ये चार शिक्षक मंजूर असूनही शिक्षकांच्या अनुपस्थितीपुळे मुलांच्या होणाऱ्या नुकसानीने त्रस्त झाले आहेत. शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासठी येथील पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आज पंचायत समिती कार्यालयाता धडक दिली या वेळी गटविकास अधिकारी जगताप यांनी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वास्स्ति केल्याची माहिती पालकांनी दिली.

आश्वासन हवेतच विरले
कुवेशी केंद्रशाळा नं. १ मधील एक शिक्षक गत महिन्यापासून गैरहजर असल्याची बाब ग्रामस्थांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केली आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीने यापूर्वी गटशिक्षणाधिका-यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्या वेळी त्यांनी दोन दिवसात अहवाल देण्याचे आश्वासित केले होते; मात्र हे आश्वासन हवेतच विरले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 17/Jan/2025