पावस : राजापूर तालुक्यातील मिळंदमधील महिलांच्या डोक्यावर हंडा उतरणार आहे. येथील नवीन पाणी योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येकाच्या घरांत नळाद्वारे पाणी मिळणार आहे. या गावांमध्ये डोंगराळ भाग असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. मार्चनंतर तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेतून नवीन पाणीयोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६९ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सरपंच कीर्ती आयरे यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर होणार आहे.
मिळंद गावची लोकसंख्या सुमारे दीड हजार असून, सात वाड्या आहेत. या सात वाड्यांसाठी मिळंद ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजनेंतर्गत मुख्य योजनेची टाकी (ढोल आंब्याचे टेप) या बांधण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कामाचे भूमीपूजन सरपंच कीर्ती आयरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. त्यामुळे गावातील प्रत्येकाला नळाद्वारे पिण्याचे पाणी प्रत्येकाच्या घरात देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गावातील महिलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी उपसरपंच रवींद्र गुरव, सदस्य विजया माने, नेहा गुरव, ग्रामसेवक अमृता शिवलकर, बाजीराव विश्वासराव, संदीप आयरे, आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 23/Jan/2025














