Breaking : ऑपरेशन टायगर, धनुष्यबाण ला रत्नागिरीतून सुरवात; पहिल्याच टप्प्यात सामंतांनी उबाठाचा केला सुपडा साफ

रत्नागिरी : रत्नागिरीत आज शिवसेनचा मोठा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील उरल्या सुरल्या उबाठा पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी उदय सामंत आणि भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.

ऑपरेशन टायगर, ऑपरेशन धनुष्यबाण संपूर्ण महाराष्ट्रात २४ तारखेनंतर सुरु करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सांगितले होते. आज रत्नागिरी पासून या मिशनची सुरुवात झाली.

पहिल्याच टप्प्यात उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह हरचेरी विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर, माजी पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, करबुडे विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, गोळप उप विभागप्रमुख दत्ता तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत सामील झाले. एकंदर पहिल्याच टप्प्यात सामंतांनी उबाठाचा सुपडा साफ केल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:25 24-01-2025