रत्नागिरी : आकडी आलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : आकडी आल्याने बेशुद्ध झालेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय शांताराम पोवार (४५, रा. वरवडे, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय पोवार यांना गुरुवारी (ता. २३) आकडी आल्याने ते बेशुद्ध झाले. नातेवाईकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 27/Jan/2025