रत्नागिरी : शहरातील न्यायालयाच्या समोर मोटारीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. संशयित स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश इंद्रसेन पाटील (वय ३०) व इंदसेन गोपीनाथ पाटील (दोघे रा. भंडारपुळे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. २५) सायंकाळी न्यायालयाच्या समोरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश विंचुकर हे कुटुंबासोबत मोटारीतून वायगणी ते साळवी स्टॉप येथे जात असताना सायंकाळी पाठीमागून येणारी दुचाकीने मोटारीला धडक दिली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 28/Jan/2025













