रत्नागिरी : शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : अज्ञात कारणातून रत्नागिरी शहरातील शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या मारहाणीत कर्मचारी जखमी झाला असून, मारहाणप्रकरणी तिघांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत कांबळे, प्रताप सुदाम कांबळे आणि शुभम पाडाळकर अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. तर, या मारहाणीत रितेश मधुकर सोनवणे (२९, मूळ रा. जळगाव, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या दरम्यान ते मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या रूम नंबर ४ मध्ये काम करत होते. त्या वेळी तिघांनी तिथे येऊन त्यांना मारहाण केली.

मात्र या कर्मचाऱ्याला मारहाण का झाली? हा प्रश्न देखील निर्माण होत आहे. मारहाणप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१, (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 29-01-2025