स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनेचे उद्दिष्ट योजनेचे दोन दिवस आधीच पूर्ण : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : येथील स्वरूपानंद पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचे १० कोटींचे उद्दिष्ट योजनेचे दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण झाल्याची माहिती अध्क्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

ते म्हणाले, नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ १० कोटींच्या नव्या ठेवी संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. १ जानेवारी २०२५ पासून सुरू असलेल्या या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या सर्व १७ शाखांमध्ये ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून संस्थेने जाहीर केलेले १० कोटींचे उद्दिष्ट या स्वागत ठेव योजनेचे दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण झाले. संस्थेच्या ठेवी ३३८ कोटी ४५ लाख झाल्या असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात आजअखेर संस्थेकडे ४३ कोटींच्या नव्या ठेवी संकलित झाल्या.

स्वागत ठेव योजनेचे नावीन्य म्हणून जाहीर केलेल्या ६ लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या योजनेला भरभरून प्रतिसाद प्राप्त झाला असून या योजनेत ६ कोटीची ठेव जमा झाली. स्वागत ठेव योजनेत १०२२ ठेवखात्यांच्या माध्यमातून ठेव जमा झाली असून अजूनही या ठेव योजनेचे दोन दिवस शिल्लक आहेत. या योजनेचा लाभ अधिकाधिक ग्राहक ठेवीदारांनी घ्यावा, असे आवाहन ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 30-01-2025

Khabardar diwali fest