चिपळूण : शिरळ येथील स्व. रामचंद्र साठे स्मृती शिरळ वाचनालयाचा रौप्यमहोत्सवी समारंभ दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वा. होणार आहे. शिरळ वाचनालय येथे हा कार्यक्रम होईल. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वा. वाचू आनंदे या अंतर्गत नॅशनल इंग्लिश स्कूल मिरजोळी, दलवाई हायस्कूल मिरजोळी व नूतन माध्यमिक स्कूल कालुस्ते तर दि. १ फेब्रुवारी रोजी डीबीजे महाविद्यालय चिपळूण येथे व्याख्यान होईल. सायंकाळी ५ वा. पुणे येथील विपुल शहा यांचे ‘आर्थिक नियोजन व त्याची गरज’ या विषयी कै. बाळशास्त्री जांभेकर (लोटिस्मा) सभागृहात व्याख्यान होईल. सायंकाळी ७ वा. शिरळ वाचनालय येथे संगीत रजनी हा कार्यक्रम होईल.
दि. २ फेब्रुवारी रोजी रौप्यमहोत्सवी सोहळा होईल. यावेळी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर साठे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संचालक प्रकाश देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी खा. हुसेन दलवाई, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, माजी आ. डॉ. विनय नातू, माजी आ. सदानंद चव्हाण, रमेश कदम, उद्योजक प्रशांत यादव, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पा पटवर्धन, संजय शिर्के, अॅड. दीपक पटवर्धन आदी उपस्थित राहाणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 31/Jan/2025














