पावसाळ्यापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होईल : खा. नारायण राणे

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू असून, येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी बहुतांश काम करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले असल्याचे माहिती रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी येथे दिली.

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. गेली अनेक वर्षे हा महामार्ग रखडला असून तो लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत. यावेळी नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. संजय राऊतना चांगले दिसत नाही. ते ज्या बातम्या देतात, त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात, अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

त्यांना एके दिवशी चांगले बोलायला आम्ही शिकवू….
उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. काही दिवस ते गप्प होते, पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना चांगले दिसत नसल्याने तो शब्द वापरतो, त्यामुळे त्यांना एके दिवशी चांगले बोलायला आम्ही शिकवू, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 03/Feb/2025