डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीवर रत्नागिरी पोलिसांत बीएनएस कायद्यांतर्गत कारवाई
रत्नागिरी: Ratnagiri Pomendi Assault News संदर्भात प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादाची कुसळ मनात धरून एका व्यक्तीवर हातातील दगडाने डोक्यात गंभीर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मारहाण व गंभीर दुखापत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाटेत अडवून विचारला जाब पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, फिर्यादी किशोर लुकाजी पवार (वय ४७, व्यवसाय: रिक्षा चालक, रा. घर नं. २४७/ब, पोमेंडी बुद्रुक बौद्धवाडी) हे २९ जुलै रोजी दुपारी घराकडून रत्नागिरी शहरात जाण्यासाठी बस स्टॉपच्या दिशेने चालत निघाले होते. वाटेत मंगेश कदम यांच्या घराजवळ आले असता त्यांना वाडीतील रहिवासी विनोद बाबू पवार भेटल्याने ते दोघे थांबून गप्पा मारत होते.
डोक्यात मारला दगड, जमिनीवर पाडून पुन्हा हल्ला दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सागर सुरेश पवार (वय ३२, रा. पोमेंडी बुद्रुक, ता. व जि. रत्नागिरी) तेथून गेला आणि काही वेळातच वळण मारून परत फिर्यादीजवळ आला. “तू माझ्या बाप्पाला शिवीगाळी का करतोस?” असा जाब विचारत आरोपीने अचानक हातातील मोठा दगड फिर्यादीच्या डोक्याला डाव्या बाजूला कानावर मारला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे किशोर पवार चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतरही आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात पुन्हा मारून गंभीर दुखापत केली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फिर्यादींवर उपचार केल्यानंतर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सागर सुरेश पवार याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:48 31-07-2026














