IMDb ने जाहीर केली आजवरच्या सर्वोत्तम २५० भारतीय चित्रपटांची नावं..

सिनेमा, टीव्ही‌ शोज यांची इत्यंभूत माहिती सांगणारी लोकप्रिय वेबसाईट आयएमडीबीने आजवरच्या सर्वोत्तम २५० भारतीय चित्रपटांची नावे जाहीर केली आहेत. देशभरातील चाहते काय ट्रेडिंगमधे आहे, नवीन कंटेंट कोणते आहे हे शोधण्यासाठी व काय बघावे व कुठे बघावे हे ठरवण्यासाठी आयएमडीबी इंडियाच्या सोशल मीडिया हँडल्सचा वापर करतात.

IMDbच्या नियमित वापरकर्त्यांनी दिलेल्या रेटिंग्जच्या आधारावर सर्वोत्तम भारतीय चित्रपटांची यादी तयार करण्यात आली आहे.

12th फेल पहिल्या क्रमांकावर

आयएमडीबीने जाहीर केलेल्या आजवरील सर्वोत्तम भारतीय सिनेमाच्या 12th फेलने पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर ‘महाराजा’, ‘कांतारा’, आणि ‘लापता लेडीज’ सारख्या आजच्या काळातील हिट्सबरोबर ‘जाने भी‌ दो यारों’, ‘पेरीयेरुम पेरुमल’, आणि पाथेर पांचाली’ अशा अभिजात कलाकृतीसुद्धा आहेत. आयएमडीबीवर या २५० चित्रपटांना एकत्रित मिळून ८५ लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत.

या यादीमधील टॉप २० सिनेमांची नावं

१. 12th फेल
२. गोल माल
३. नायकन
४. महाराजा
५. अपूर संसार
६. अंबे सिवम
७. पेरियेरुम पेरुमल
८. 3 इडियटस
९. होम
१०. मेनिचित्रथाझू
११. ब्लॅक फ्रायडे
१२. कुम्बलंगी नाईटस
१३. रॉकेटरी: द नंबी इफेक्ट
१४. 777 चार्ली
१५. किरीदम
१६. कांचारापालेम
१७. तारें जमीं पर
१८. संदेशम
१९. दंगल
२०. लापता लेडीज

२०२४ मधील पाच चित्रपटांचा समावेश

२०२४ मधील ‘महाराजा’, ‘मैदान’, ‘द गोट लाइफ’, ‘लापता लेडीज’, आणि ‘मंजुमेल बॉयज’ या पाच चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. या यादीतील सर्वांत जुना चित्रपट म्हणजे १९५५ साली प्रदर्शित झालेला सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’ आहे.

मणि रत्नम आणि अनुराग कश्यप यांचे सर्वाधिक चित्रपट

दिग्दर्शक मणि रत्नमचे या यादीमध्ये सर्वाधिक सात चित्रपट आहेत व त्यानंतर या यादीत अनुराग कश्यप याचा क्रमांक येतो.त्याचे या यादीत सहा सिनेमे आहेत.

पहिला भाग आणि सिक्वेल दोन्ही यादीत असलेले सहा सिनेमे

या यादीमध्ये सहा सिनेमे असे आहेत ज्यांच्या सिनेमाच्या पहिल्या भागासह त्याचा सिक्वेलचाही या यादीत समावेश आहे. त्यात ‘दृश्यम १ (मल्याळम)’ आणि ‘दृश्यम २ (मल्याळम)’, ‘दृश्यम १ (हिंदी)’ आणि ‘दृश्यम २ (हिंदी)’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जिगरथंडा’ आणि ‘जिगरथंडा डबलेक्स’, ‘केजीएफ: चॅप्टर १’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर २’, तसेच ‘बाहुबली: द बीगिनिंग’ आणि ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ यांचा समावेश आहे.

12th फेलबद्दल विक्रांत मॅस्सी म्हणाला…

’12th फेल’ हा चित्रपट यादीत सर्वोच्च स्थानावर आल्याबद्दल अभिनेता विक्रांत मॅस्सीने आनंद व्यक्त केला. त्यांनी चित्रपटातील सर्वाधिक भावूक प्रसंगाचा उल्लेख केला. तो म्हणाला, “मला या सिनेमातील एक प्रसंग विशेष वाटतो तो म्हणजे मनोज आणि त्याच्या आईमधील चंपीचा प्रसंग आहे. हा प्रसंग चित्रपटातील अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच क्षणी मनोजला कळते की त्याची आजी वारली आहे. हा प्रसंग विशेष बनला कारण तो चित्रीत करण्यासाठी खूप तयारी आणि नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगाच्या पार्श्वभूमीत संध्याकाळचा प्रकाश दाखवला आहे, जो फक्त काही मिनिटे टिकतो. विधू विनोद चोपडा सर आणि डीओपी रंगराजन रामाबद्रन यांनी या मास्टरशॉटचे खूप आधी नियोजन केले होते. आम्हाला त्या थोड्याश्या वेळेत सर्व कलाकारांनी अचूक कामगिरी करणे अपेक्षित होते.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 02-10-2024