“समर्थ कीबोर्ड क्लासेस”चे नव्या जागेत उदघाटन!

उद्योजक तथा समाजसेवक मुकेश गुंदेचा यांच्या हस्ते उदघाटन


शहराच्या मध्यवर्ती भागात आरोग्य मंदिर येथे नवा सेटअप

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध कीबोर्ड आर्टिस्ट राजू किल्लेकर यांच्या “समर्थ कीबोर्ड क्लासेस”चे शांतीनगर येथून शहराच्या मध्यवर्ती भागात आरोग्य मंदिर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. आरोग्य मंदिर येथील शंखेश्वर हेरिटेज (विंग A-18) येथील नव्या जागेतील क्लासेसचे 2 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध युवा उद्योजक तथा समाजसेवक मुकेश गुंदेचा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

किल्लेकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या त्यांच्या शिष्यगणांत कीबोर्ड वादनाची उत्तम हातोटी तयार होत आहे. काही बालवादक कलाकार स्टेजवर कीबोर्ड वादनही करु लागले आहेत, हे समर्थ क्लासेसचे श्रेय म्हणता येईल.

उदघाटक मुकेश गुंदेचा यांनीही समर्थ क्लासेसबद्दल आणि मार्गदर्शक किल्लेकर यांच्याबद्दल गौरवोदगार काढले आहेत. क्लासचा सेटअप उत्तम असल्याचे सांगत त्यांनी किल्लेकर यांचा अनेक वर्षांचा कीबोर्ड वादनाच्या अनुभवातून समर्थ क्लासेसमधून भविष्यात निश्चितच उत्कृष्ट कलाकार घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर रत्नागिरीतील कीबोर्ड प्रेमींनी समर्थ क्लासेसमध्ये जरूर प्रवेश घेण्याचे आवाहन केले.

कीबोर्ड शिकण्यास सर्व वयोगटातील इच्छुकांच्या व पालकांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेल्या आरोग्य मंदिरच्या क्लासला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, नव्या बॅचेमध्ये नवनोंदणी आजही सुरू आहे. नव्या स्वरूपातील कीबोर्ड क्लास सेवेस सज्ज झाला आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांनी 7020868037 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन संचालक, मार्गदर्शक राजू किल्लेकर यांनी केले आहे.

उदघाटन समारंभाला उदघाटक मुकेश गुंदेचा, गायिका संध्या सुर्वे,डॉ. रोजा भुर्के,जेष्ठ वादक विलास हर्षे, संजय पाटणकर,गायत्री व्हिडिओचे किरण खेडेकर, मेधा शिंदे,मयुरेश नाटेकर, संतोष कुळकर्णी,नितीन गावकर, क्लासचे सर्व विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 05/Feb/2025