राजापुरात आज ‘जादूची पेटी’ सांगितिक मैफलीचे आयोजन

राजापूर : सांस्कृतिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मित्रमेळा संस्थेतर्फे बुधवारी (ता. ५) शहरातील राजापूर हायस्कूलच्या पटांगणात ‘जादूची पेटी’ या सुरेल सांगितिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजा पेटी किंवा हार्मोनियम या वाद्याचा प्रवास, इतिहास समजून घेताना हार्मोनियम उमटणाऱ्या जादुई स्वरांनी सजलेली लोकप्रिय गाणी याचा आनंद घेण्याची संधी राजापूरवासीयांना मिळणार आहे. कार्यक्रमामध्ये जागतिक कीर्तीचे हार्मोनियम वादक व संगीत संयोजक आदित्य ओक, सत्यजीत प्रभू हे सहभागी होणार आहेत. त्यांना प्रसाद पाध्ये यांची तबलासाथ आणि अनिल करंजवकर यांची ढोलक अन् ढोलकीची साथ मिळणार आहे.

राजापूर हायस्कूलच्या पटागणांवर सायंकाळी ६ वा. विनामुल्य होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून राजापूरवासियांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मित्रमेळा राजापूरतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 05/Feb/2025

Arihant 3