रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दहावी बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आल्याने धास्ती लागून राहिली आहे. सराव परीक्षेद्वारे अभ्यासाची तयारी केली जात आहे. शाळा, महाविद्यालयांकडूनही सराव चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. १२वी थी परीक्षा ११ फेब्रुवारी ते ८ मार्च वर १०वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे.
दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या पालकवर्गातही परीक्षेचे वातावरण आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून बारावीच्या प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षांना सुरुवात झाली आहे. त्या दृष्टिकोनातून शालेय वार्षिक नियोजनानुसार डिसेंबर अखेरपर्यंत व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वार्षिक स्नेहसंमेलन व सहलीसारखे उपक्रम झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरावर परीक्षा आल्याने आता खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. त्या अनुषंगाने शिक्षकही अलर्ट झाले आहेत. पूर्व परीक्षा वेळेत पार पडून उजळणीला पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी शिक्षकांकडून अभ्यासक्रम उरकण्यात आला आहे, शाळा महाविद्यालये अंतर्गत स्तरावर सराव चाचण्यांवर भर देत असून, विद्यार्थ्यांची संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी होणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
शाळा, महाविद्यालयांकडून आपला निकाल चांगला लागावा, यासाठी प्रयत्न होत आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात शाळांतून वार्षिक क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, सहती आदीची लगबग असते. असे असले तरी या विद्यार्थी व शिक्षकांचा सर्व फोकस अभ्यास आणि परीक्षांवरच राहणार आहे. त्यामुळे अध्यापन आणि अध्ययन या दोन्हीसाठी कसरत करावी लागणार आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढणार की घसरणार? हा नेहमीच औत्सुक्याचा विषय बनलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता सिद्ध करणाच्या बोर्ड परीक्षेचे औत्सुक्य वाढले आहे. परीक्षेसाठी आता कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासावर जोर द्यावा लागणार आहे. वातावरणासाठी अभ्यासपूरक पालकांनाही आता आपल्या टी. व्ही. मोबाईल पाहण्याच्या सवयीला काही काळ मुरड घालावी लागणार आहे.
यंदा लवकर परीक्षा…
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या बोडांच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असतात. अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्याकरिता मंडळाने परीक्षेच्या तारखा यंदा लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि चारावीची परीक्षा यंदा ८ ते १० दिवस आधी घेण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 05/Feb/2025














