चिपळूण : तालुक्यातील गाणे गुरववाडी येथील ऋषिकेष गणेश गजमल (२६) याने शनिवारी दुपारी १ वाजता शेतातील वाड्याच्या भालाला गळफास घेवून आत्महत्या केली. तो सकाळी गावातील एकाला पाण्याच्या टाकीजवळ भेटला होता. यावेळी त्याने मी आकले येथे मंडप सोडायला जाणार आहे.
मात्र दुपारी २ वाजता तू शेतातील वाड्यात ये, असे सांगितले. त्यानुसार तो गेला असता तेथे त्याला ऋषिकेश हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. त्यामुळे त्याने दिलेल्या खबरीनुसार अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 05/Feb/2025














