आपले वाद सामोपचाराने मिटवावेत; प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन
रत्नागिरी:
Ratnagiri Lok Adalat (रत्नागिरी राष्ट्रीय लोक अदालत) च्या माध्यमातून राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार येत्या १२ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोक अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले प्रलंबित वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.
सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी पक्षकारांनी साधावा संपर्क
आपली प्रलंबित प्रकरणे अथवा वाद लोक न्यायालयात ठेवून ते आपसात सामंजस्याने सोडवण्यासाठी पक्षकारांनी आपले वकील, संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:09 24-07-2026













