खेड : कोकण रेल्वे मार्गाच्या ७४१ कि.मी. मार्गाचा दुपदरीकरणाचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. तथापि, रोहा ते वीर हे ५० किमीचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित मार्गावर बोगदे वगळून दुपदरीकरण करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. यासाठी कोकण रेल्वे बोर्डचे एलआयसीच्या गुंतवणुकीतून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून ३ हजार कोटी रुपये प्राथमिक स्वरूपात दिले जाणार आहेत.
कोकण रेल्वेमुळे भारतीय रेल्वेला एक नवीन आयाम मिळाला आहे. दक्षिण भारत ते उत्तर भारत असा जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग ठरणार असल्याने या मार्गाच्या विस्तारावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील एकूण २२६ कि. मी. मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार असून, यासाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गाचे कोल्हापूर ते रिद्धपूर पर्यंतच्या मार्गावर सर्वाधिक बोगदे आहेत. या बोगद्यांमध्ये दुपदरीकरण करणे सध्या तरी शक्य नसल्याने या मार्गासाठी काय योजना आखता येईल, याची प्राथमिक चर्चा सुरू आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूला पासिंग सेंटर तयार करून बाकी मार्गाचे दुपदरीकरण करण्यावर भर दिला जात आहे.
रेल्वे स्थानके वाढवण्याच्या कामाला ‘खो’
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक गतिमान व्हावी, म्हणून सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना १२ रेल्वे स्थानके वाढवण्याचा निर्णय झाला होता. तसेच रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी एलआयसीकडून मोठी गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, सुरेश प्रभूचे मंत्रिपद गेल्यानंतर या कामाला काहीसा ‘खो’ बसला.
तामिळनाडू, कर्नाटक, केरळपर्यंत विस्तार
२०२५-२६ या वर्षासाठी कोकण रेल्वेला ४६२ कोटींची तरतूद आहे; तर कर्नाटक साठी ७ हजार ५६४, तामिळनाडूचा ६ हजरत ६२६ केरळसाठी ३०४२ कोटी निधी देण्यात आला आहे. गोव्यातील ट्रॅक दुहेरीकरण, ट्रॅक नूतनीकरण यासाठी ५ हजार ६९६ कोटी खर्च केले जाणार आहे. महाराष्ट्रात कोकण रेल्वेचा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांतील दुहेरीकरणाचाही विचार केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:07 PM 06/Feb/2025
