मारहाणप्रकरणी खेड पोलिसांकडे गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील लोटेमाळ येथे दि. ३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एकाला मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयकुमार रज्जुसिंग मरावी (वय २४ वर्षे, व्यवसाय गोपालक) यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे.

संजयकुमार हे संजय नलावडे यांच्या भाड्याच्या खोलीत खेड येथे राहतात. ते नलावडे यांच्या गाईंची देखभाल करतात. दि. ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गाईंना लोटेमाळ येथे चरवत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत सतिश देवराज मरावी होते. तेथे एका इसमाने येऊन त्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयित लोटेमाळ येथे निघून गेले. मारहाणीत संजयकुमार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 07/Feb/2025