Nashik court summons Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीरांबद्दलचे आक्षेपार्ह विधान भोवणार; नाशिक कोर्टाने राहुल गांधीना बजावले समन्स

मुंबई : Nashik court summons Rahul Gandhi लंडनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर नाशिक: विरोधी पक्षनेते आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी (veer savarkar) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करताना पाहायला मिळतात. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना नाशिक कोर्टाने समन्स बजावले आहे. राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर (Vinayak Damodar Savarkar) विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यप्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने त्यांना हे समन्स बजावले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी २०२२ मध्ये हिंगोलीत झालेल्या एका जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरुद्ध निर्भय फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी २०२२ मध्ये कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणी झाल्यानंतर नाशिक जिल्हा कोर्टातील अतिरिक्त मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राहुल गांधी यांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल कोर्टात दाद मागण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांविषयी दाखले सादर करण्यात आले. राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानात भाजपचा उल्लेख होता. Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar Natyagruha Ratnagiri स्वातंत्र्यवीर सावरकर असताना भाजप पक्ष अस्तित्वात देखील नव्हता, असे कोर्टात सांगण्यात आले. निर्भय फाउंडेशनकडून वकील मनोज पिंगळे यांनी बाजू मांडली.

सुनावणी दरम्यान कोर्टात सादर करण्यात आलेल्या माहिती आणि पुरावे याआधारावर न्यायमूर्ती यांनी सीआरपीसी कलम २०४ व भारतीय दंड विधान कलम ४९९ व ५०४ नुसार राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. देशभक्त व्यक्तीविरोधात आक्षेपार्ह विधान हे मानहानी कारक असल्याचे दिसून येत आहे, असे कोर्टाने आदेशात म्हटले.

पुणे कोर्टाकडून देखील समन्स
लंडनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर खटला दाखल करण्यातला कोर्टात धाव घेतली होती. लंडन येथे भारतीय लोकांसमोर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. याबाबतचा अहवाल पोलिसांनी पुणे कोर्टात दाखल केला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे कोर्टात राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 02-10-2024