लांजा : रुण पराडकरवाडी येथील वणव्यात १५० काजूची झाड खाक

लांजा : अचानकपणे वनव्यामुळे लागलेल्या आगीत रुण पराडकरवाडी येथील शेतकऱ्याची १५० काजू कलमे त्याचप्रमाणे व गवताच्या वरंडी जळून खाक झाल्या. इतर दोन शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रुण बापेरे गावाच्या सिमेवर घडली आहे.

सदरची घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली आहे. यामध्ये रुण- बापेरे गावच्या सीमेवर असलेल्या रामचंद्र सुर्वे यांच्या काजूच्या बागेत अचानकपणे वणव्यामुळे आग लागली. सदर आगीमध्ये त्यांची १५० काजूची कलमे जळून नुकसान झाले आहे. त्याच बरोबर शेतात गुरांना खाण्यासाठी ठेवलेल्या १५० गवताच्या वरंडी देखील जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे सुर्वे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर रामचंद्र सुर्वे यांचे लगतच्या नामदेव कृष्णा पराडकर यांचे आणि सुभाष वालम (बापरे) यांचे देखील वणव्यामुळे नुकसान झाले आहे या घटनेत तीनही शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून आपणास योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 07/Feb/2025