महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांची बरीच गाणे लोकप्रिय झाली आहेत. दरम्यान आता त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘मारो देव बापू सेवालाल’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला रसिकांची पसंती मिळताना दिसते आहे.
अमृता फडणवीस यांचे ‘मारो देव बापू सेवालाल’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर रिलीज केले आहे. या गाण्यात अमृता फडणवीस बंजारा लूकमध्ये दिसत आहेत. हे गाणे गीतकार निलेश जालमकर यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. तर याचे संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे. अमृता फडणवीस यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 08-02-2025
