आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी व प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी चा वार्षिक (वनभोजन ) तवसाळ- रोहिले बीच येथे संपन्न

रत्नागिरी : कोकणाला लाभलेला अथांग समुद्र किनारा याची भुरळ परदेशी व देशातील पर्यटनकांना ओढ आहे.

दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी दरवर्षी प्रमाणे यंदाही आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी व प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी याच्या नियोजन बद्ध कार्यक्रम १ ली ते ७ वी आदर्श शाळा तांबड्याडी व बालवाडी तसेच प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी मधिल १ ते ५ वी बालवाडी असा शाळेचा गृप या सनेह भोजन कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.

दरवर्षी प्रमाणे यंदाही वार्षिक सहल नियोजन करण्यात आले होते. गड किल्ले दाखविण्यासाठी चंग बांधलेला होता. पण मागील काही महिन्यात अनेक शाळेतील सहलीचे अपघात होत आहेत. ह्या दुर्घटना टाळण्यासाठी कॅन्सल करत चांगला निर्णय घेण्यात आला. म्हणून सालाबादप्रमाणे वनभोजन आयोजन करण्यात आले. वनभोजन कार्यक्रम आनंद घेत, गाण्याच्या तालावर भेंड्याची जुगलबंदी रंगली मुलांनी वाळू वरती चित्रे रेखाटली, कबड्डी, खोखो, क्रिकेट खेळत समुद्र लाटांवर आनंद लुटला.

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी चे मुख्याध्यापक- अंकुर मोहिते सर, संदिप भोये सर, साईनाथ पुजारा सर, तवसाळ बाबरवाडीचे मुख्याध्यापक- प्रमोद साळवी सर, ज्ञानेश्वर कोकाटे सर अंगणवाडी सेविका संगिता सुर्वे मॅडम, निसर्गाच्या सान्निध्यात उत्तम जेवण बनवून वनभोजनाचा आस्वाद घेतला. शाळेतील जेवण बनवायला आजी श्रीमती सुभद्रा कुरटे आजी सोबत होत्या.

एक दिवस मुलांसाठी देण्यासाठी सरसावल्या महिला मंडळ माता पालक तांबडवाडी मधील सौ. प्रेरणा घाणेकर,सौ. हर्षदा निवाते ,सौ.मनस्वी घाणेकर, सौ.जागृती पाडवळे, सौ. कविता घाणेकर, सौ.वैजंती थोरसे, सौ. राजश्री कुरटे,सौ. वनिता कुरटे, बाबरवाडी मधील सौ. श्रावणी नाचरे, सौ.संजना हुमणे सौ.सानिया येद्रे, सौ. स्वरा जोशी, सौ.वनिता येद्रे इत्यादी महिला उपस्थित होत्या, या नियोजन साठी मा. मुख्याध्यापिका सौ ललिता गोलमडे मॅडम शुभेच्छा दिल्या तर सोशल मीडिया प्रसार माध्यम Dj श्री सचिन कुळये संपन्न झालेल्या वनभोजन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:49 08-02-2025