Swami Swarupanand Pathsanstha | मंगलमय सणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी ठेव योजनेचा प्रारंभ

◼️ दहा कोटींच्या ठेव संकलनाचे उद्दिष्ट

रत्नागिरी : मांगल्यमय सणासमारंभाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची Swami Swarupanand Pathsanstha दसरा दिवाळी ठेव योजनेचा प्रारंभ दि.३ ऑक्टोबर गुरुवारपासून होत आहे.

विस्तारलेला जनाधार
नुकत्याच संस्थेने ३२५ कोटींच्या ठेव संकलनाचा टप्पा पार केला असून, ३२५ कोटींची ही ठेव १७ शाखांमध्ये ५० हजार च्या पुढे असलेल्या ठेव खात्यांमधून संकलित झाली आहे. ३२५ कोटींच्या ठेवी आणि ५० हजार खाती ही आकडेवारी संस्थेच्या विस्तारलेल्या जनाधाराचे द्योतक म्हणता येईल.

विश्वासार्ह संस्था
विश्वासार्हता, शिस्त, पारदर्शकता, उत्तम ग्राहक सेवा आणि सहकारीकतेचा दृष्टिकोन सर्वोपरी ठेवून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था काम करत आली आहे.त्यामुळे मोठा ग्राहक वर्ग संस्थेशी जोडला गेला आहे.

गुंतवणुकीसाठी उत्तम संधी
आर्थिक संस्थेत गुंतवणूक करताना ठेविदारांनी डोळस दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे असते.आपण गुंतवणूक करतो त्या संस्थांची बलस्थाने कोणती? संस्थेचे आर्थिक सातत्य आहे का? संस्थेचा स्वनिधी, संस्थेच्या गुंतवणुका ,संस्थेचा ऑडिट वर्ग, संस्थेची वसुली यावर गुंतवणूकदार अधिक सजगपणे लक्ष देतो आणि स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने ४७ कोटींचा स्वनिधी, १४६ कोटींच्या उत्तम गुंतवणुकी, ९९.३२% वसुली ,२८% भांडवल पर्याप्तता, सातत्याने प्राप्त होणारा ‘अ’ लेखापरीक्षण वर्ग, नवीन तंत्रज्ञानाशी मैत्री, ग्राहकाभिमुख धोरणे हे आपले मानबिंदू सुस्थापित केले आहेत.सुरक्षित गुंतवणूकीसाठी आदर्श असणारी ही व्यवस्था म्हणूनच ठेवीदारांचा विश्वास प्राप्त करण्यात संस्था यशस्वी झाली आहे.

या पार्श्वभूमीवर दसरा दिवाळी ठेव योजनेमध्ये अत्यंत आकर्षक मात्र सुरक्षित असे व्याजदर देऊन संस्थेने ठेव योजना घोषित केले आहेत. या योजनेसाठी १२ ते १८ महिने मुदतीच्या ठेवीवर ८.२५% तर ज्येष्ठ नागरीक व महिला यांचेसाठी ८.५०% व्याजदर संस्थेने घोषित केला आहे. १९ ते ३६ महिने मुदतीच्या योजनेसाठी ८.४०% व ज्येष्ठ नागरकि व महिला ८.६०% दर घोषित करण्यात आला आहे.एकरक्कमी रु.५ लाख व त्यापुढील रक्कमेसाठी ८.७५% व्याज दर देण्यात आला आहे.

या ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून आकर्षक तेवढ्याच सुरक्षित गुंतवणुकीचे लाभार्थी होण्यासाठी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये सहभागी व्हावे. पारंपारीक ठेवीदारांनी आपली परंपरा वृद्धिंगत करावी तर नव ठेवीदारांनी मंगलमय सणांच्या पार्श्वभूमीवर स्वरूप आर्थिक परिवाराशी संलग्न व्हावे, असे विनम्र आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 02-10-2024