रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे ‘हापूस’ आंबा पिकाचे चित्र अद्याप तरी अस्पष्टच आहे. यावर्षी फेब्रुवारीतच हापूस बाजारात आला होता; मात्र यावर्षी ते प्रमाण अत्यल्पच आहे. मार्चच्या अखेरीस बाजारात बोलबोला राहील, असे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.
यंदा पावसाळा लांबल्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली पावसामुळे ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर मोहोरप्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे एका बाजूला मोहोर व एका बाजूला पालवी, असे संमिश्र चित्र राहिले.
झाडावर फुलोराच राहिल्याने फळधारणा झालीच नाही. सध्या थंडी गायब आहे; मात्र काही ठिकाणी पुनर्मोहर सुरू झाला आहे. काही ठिकाणी मोहोराच्या टोकाला फळधारणा सुरू झाली आहे, मात्र ती टिकणारी नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
गतवर्षीच्या हंगामात फेब्रुवारीमध्येच आंबा बाजारात आला होता तर कॅनिंगसाठी ११ एप्रिलपासून आंबा उपलब्ध झाला होता. यावर्षी आंबा हंगामाचे चित्र बदलले आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर बाद झाला असून, दुसऱ्या टप्यात पुनर्मोहर सुरू झाला असून, पहिल्या टप्यातील वाचलेल्या फळांना तो धोकादायक ठरणार आहे.
हापूस हंगामाचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. सध्या बागायतदारांना फक्त मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या काही वर्षांत हापूसचे उत्पादन लवकर हाती येत होते- सलील दामले, आंबा बागायतदार,
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 08/Feb/2025
