गुहागर : तळवली येथे शिबिरातून दिली शासकीय योजनांची माहिती

गुहागर : महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विविध योजनांची माहिती देणे व त्यावर अंमलबजावणी करणे याबाबत नुकतेच तळवली ग्रामपंचायत कार्यालय येथे शिबिर झाले.

यामध्ये गट मधील नावात दुरुस्ती, मयत खातेदारांचा वारस तपास, गट सदरील सहहिस्सेदार नोंद करणे, ग्री स्टॅक योजनेची माहिती व आधार लिंक करणे, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, पी.एम. किसान योजना, ई-पीक पाहणी इत्यादी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी तळवली सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच संतोष जोशी, मंडळ अधिकारी श्री. जाधव, पोलिसपाटील विनोद पवार, तलाठी भिसे, विधी जड्याळ, सूरज गिजे, अपर्णा जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 10/Feb/2025