रत्नागिरी : अभ्यंकर -कुलकर्णी महाविद्यालयाच्या सहकार अंकाचे प्रकाशन

रत्नागिरी : अभ्यंकर -कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आणि तिन्ही शाखांचे विभागप्रमुख उपस्थित होते. प्राचार्य, मान्यवरांच्या हस्ते सहकाराचे ई बुकही प्रकाशित झाले. या वेळी गानू यांनी सांगितले की, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू या पाच भाषांमध्ये सहकारचे साहित्य स्वीकारले.

विद्यार्थी आणि शिक्षकांचे उत्तम लेख, कथा, कविता, एकांकिका, पुस्तक परीक्षण असे सर्वस्पर्शी साहित्य आणि अतिशय विलोभनीय व सुंदर चित्रे यांचा समावेश ‘सहकार ‘मध्ये करण्यात आला आहे. यावेळी संपादक मंडळ सदस्य प्रा. मकरंद दामले, प्रा. अभिजित भिडे, प्रा. क्षमा पुनसकर आणि प्रा. अंमरिन बुड्ये उपस्थित होते.

चित्रांसाठी एआयचा वापर
सहकारमध्ये उत्तम सचित्र प्रभावासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आल्याचे सहकार अंकाच्या प्रमुख संपादक प्रा. मानसी गानू यांनी सांगितले. सुंदर आणि देखणी चित्रे तसेच भारतातील महत्त्वपूर्ण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांबद्दलचे विशेष सदर व्यक्ती विशेष- आयकॉनिक इंडियन्स यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 10/Feb/2025