अक्कलकोट येथील स्वामी समर्थांची पालखी आज रत्नागिरीत

रत्नागिरी : अक्कलकोट येथील स्वामी समर्थांची पालखी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत येत असून भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात ठेवण्यात येणार आहे.

दरवर्षी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांची पालखी भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे याकरिता रत्नागिरीत येत असते. यावर्षीही मंगळवारी पालखी रत्नागिरीत दाखल होईल. ही पालखी व त्यासोबत अक्कलकोट येथून येणारे भाविक श्रीराम मंदिरात सकाळी साडेनऊ वाजता दाखल होतील. देवस्थानतर्फे पालखीचे स्वागत करण्यात येईल व स्वामी समर्थांची साग्रसंगीत पूजा करण्यात येईल. त्यानंतर स्वामी समर्थांची पालखी दर्शनासाठी भाविकांना उपलब्ध असेल.

भाविकांना स्वामी समर्थांच्या पालखीचे दर्शन स. ९.३० ते १०.३० या वेळेत श्रीराम मंदिर, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे घेता येईल. सर्व भाविकांनी स्वामी समर्थांच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 11-02-2025