गुहागर : कोकणातील युवकांनी मुंबईला न जाता आता आपल्या गावातच राहून उद्योग करावा लागेल. तरुणांनी आता आपल्या हक्काच्या व्यवसायात उतरले पाहिजे, असे आवाहन कोकण दौऱ्यावर आलेल्या बळीराज सेनेचे युवा नेते विनेश वालम यांनी केले.
बळीराज सेनेचे विनेश वालम यांनी चिपळूण, गुहागर व खेड तालुक्यात संपर्क दौरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद बोबले, मनोहर पवार, सचिन खाडे, अमित बोबले आदींसह गुहागर विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष निवाते, प्रशांत भेकरे, गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड, सचिव दिनेश कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या दौऱ्यात वालम यांनी विविध ग्रामपंचायत सरपंच व गावांना भेटी देत युवकांना मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 13/Feb/2025














