आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने परुळे कस्पलेवाडी रस्त्याचे काम मार्गी

पाचल : राजापूर तालुक्यातील परूळे कस्पलेवाडी रस्त्याचे काम गेले अनेक वर्षे रखडले होते. अखेर आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे काम मार्गी लागले असून विधानसभा निवडणुकीच्यावेळी ग्रामस्थांना दिलेला शब्द किरण सामंत यांनी पूर्ण केला आहे. त्याबद्दल उपसरपंच संतोष सावंत यांनी आमदार किरण सामंत यांचे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.

या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यासाठी गेले अनेक वर्षे संतोष सावंत प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांच्या या मागणीकडे तत्कालीन लोकप्रतिनीधींनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्या समोर या रस्त्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली होती. त्यावेळी किरण सामंत यांनी निवडणूक झाल्यानंतर रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता, त्यानुसार आमदार किरण सामंत यांनी कस्पलेवाडी रस्त्याचे काम मार्गी लावून ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

त्यामुळे उपसरपंच संतोष सावंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार किरण सामंत यांचे जाहीर आभार मानले आहेत. आमदार किरण सामंत यांनी आपला शब्द पाळल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 13/Feb/2025

Arihant 1