रत्नागिरी : पेन्शन अदालत ५ मार्च रोजी

रत्नागिरी : मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी ५६ वी पेन्शन अदालत दि. ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी ११.३० वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई – ४००००१ येथे ही पेन्शन अदालत होणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक, रत्नागिरी यांनी दिली आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे ३ महिन्यांच्या आत पूर्तता झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. निवृत्तीवेतनधारक आपले अर्जाचे तिप्पट प्रति लेखा अधिकारी अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई ४००००१ ला दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी किवा त्यापूर्वी वैयक्तिक रूपाने पाठवू शकता. १४ फेब्रुवारी च्या नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नसल्याचेही डाकघर अधीक्षकांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 13/Feb/2025