रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ उद्घाटन सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी शुक्रवारी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमादरम्यान, अधिकारी असोत, प्रशासकीय अधिकारी असोत किंवा लोकप्रतिनिधी जर त्यांची मानसिकता सकारात्मक असेल, तर विकासात्मक कार्य प्रभावीपणे करता येते, असे मत ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केले. सेवा ही तत्पर आणि सकारात्मक असली पाहिजे.
आपल्याकडे येणारा प्रत्येक नागरिक हसतमुखाने परत जावा, याची जबाबदारी आपली असल्याचं ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, तालुका प्रमुख बाबू म्हाप यांसह मोठ्या संख्येने प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 15-02-2025














