राजापूर : तालुक्यातील एका गावात एका २२ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून ती गरोदर राहिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावी ही घटना घडली आहे. ही मुलगी बावीस वर्षीय असून ती मतिमंद आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. राजापूर पोलिस ठाण्यात झालेल्या तक्रारीनंतर राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक झालेली नसून जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले असून, घरात आईसह ती रहाते. ही मुलगी मतिमंद असल्याने तिचा गैरफायदा कुणी अज्ञाताने घेतला. या मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती काही आठवड्यांची गरोदर राहिल्याची घटना घडली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 18/Feb/2025














