चिपळूण नगर परिषदेतर्फे आज रक्तदान शिबिर

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने बुधवार, दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वा. न.प.च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. यानंतर अनंत आईस फॅक्टरीजवळील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी ९ वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये न.प. कर्मचारी आणि विविध संस्थांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर, सकाळी १० वा. महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर शिवशाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा शिवजन्माचा पोवाडा सादर होईल.

सायंकाळी ६ वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात स्वरांजली ग्रुप प्रस्तुत ‘छावा महाराष्ट्राचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यावेळी नागरिक व न.प. कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले, मंगेश पेढांबकर, रोहित खाड्ये व राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 19/Feb/2025

Aayurzil