जैतापूर-राजापूर येथील संशयितांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दिव्यांग फिर्यादीच्या डोळ्याचा चष्मा तुटून नुकसान
रत्नागिरी:
WhatsApp Post Assault Ratnagiri प्रकरणाची माहिती समोर आली असून, व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टमुळे मनात राग धरून फिर्यादीला त्यांची भावाजाय व इतर चार जणांनी मिळून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास एमआयडीसी येथील स्टिल आर्ट इंडस्ट्रीज येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
संशयितांची नावे आणि फिर्यादीची माहिती
सिद्दी विनायक शिर्सेकर, साक्षील शशांक शिर्वदकर, शशांक विजय शिर्वदकर, राहुल जगदीश करगुटकर (सर्व रा. जैतापूर-राजापूर) आणि एक अनोळखी महिला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात श्रीकांत देविदास शिर्सेकर (४३, रा. नवलाई संकुल, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी श्रीकांत शिर्सेकर हे कर्णबधिर व अंधत्वाने दिव्यांग असल्याची माहिती असूनही, संशयितांनी फिर्यादी नोकरीला असलेल्या कंपनीच्या गेटमध्ये शिरून त्यांना बेदम मारहाण केली.
व्हॉट्सॲप ग्रुपवरील पोस्ट ठरली वादाचे कारण
तक्रारीनुसार, फिर्यादी श्रीकांत शिर्सेकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘पंचक्रोशी समाचार’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे मनात राग धरून संशयितांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या डोळ्याचा चष्मा तुटून नुकसान झाले असून, याप्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 10-10-2026














