Horoscope Today, 20 February 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 February 2025 : आज 20 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही?

आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जास्त ताण जाणवेल. तसेच, तुम्ही लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. तसेच, आज कोणत्याही गोष्टीची देवाण-घेवाण करु नका.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं चांगलं कौतुक होईल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. आज तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही काहीसे चिंतेत असाल. मात्र, चिंता करण्याची गरज नाही. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. व्यवसायाचा विस्तार फार मोठा होईल. तसेच, परदेशात तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. जे विद्यार्थी आयटी क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळेल.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामत तुमचं मन जास्त रमेल. तसेच, इतर कोणतेही विचार तुमच्या मनात येणार नाहीत. आज तुम्ही आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे. बाहेरचे तेलकट खाद्यपदार्थ खाणे टाळा. मित्रांचा सहवा चांगला लाभेल.

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे. तसेच, आज तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. तुमच्या कामाचं बॉसकडून चांगलं कौतुक होईल. त्यामुळे तुम्ही खूप आनंदात असाल.

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं तुमच्या कामावर चांगलंच लक्ष असेल. त्यामुळे कामाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नका. तसेच, सामाजिक कार्यात तुमची जास्त आवड निर्माण झालेली दिसेल. आरोग्य छान राहील.

तूळ रास (Libra Today Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्ततेचा असणार आहे. आज कामाच्या शोधा तुम्ही फिरत राहाल. मात्र, धैर्य सोडू नका. तुम्हाला लवकरच चांगली संधी मिळेल. तसेच, व्यवसायात तुमचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तुमच्या घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.आज दिवसभरात तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुमचं वैवाहिक नातं चांगलं असेल. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर नवीन कामाची सुरुवात देखील करु शकता. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामातच व्यस्त असाल. त्यामुळे इतर गोष्टींवर तुमचं लक्ष नसेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही. मुलांच्या देखील कलागुणांना चांगला वाव मिळेल. आरोग्य एकदम ठणठणीत असेल.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. मुलांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करु नका. तसेच, संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा. मानसिक शांतीसाठी नियमित योगासन, ध्यान करणं गरजेचं आहे.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून असलेल्या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तसेच, घरगुती कामकाजात तुमचं जास्त मन रमेल. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करु शकता. तसेच, आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 20-02-2025