राजापूर : दोन विनापरवाना कातभट्ट्या वन विभागाकडून सील

रत्नागिरी : कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वन विभागाच्या आदेशानुसार राजापूर वन विभागाने वतीने राजापूर तालुक्यातील दोन विनापरवाना कातभट्ट्या सील केल्या आहेत.

कातभट्टी व कात उद्योगाबाबत शासनाने पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कातभट्टी व्यावसायिकांवर कठोर निर्बंध आणले आहेत. राजापूर तालुक्यात एकूण चार कातभट्ट्या होत्या. यापैकी दोन कातभट्ट्या गेली काही वर्षे बंद राजापूर शहरानजीक उन्हाळे येथे पन्हळेकर हर्बल प्रॉडक्ट व मठखुर्द येथे परब कातउद्योग समूह अशा दोन कातभट्ट्या सुरू होत्या. या दोन्ही कात भट्ट्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मालकांच्या समक्ष या दोन्ही कातभट्ट्या सिील करण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 20-02-2025