नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने छत्रपती शिवाजी महाराज बंदी असलेली जागा आम्हाला द्यावी, त्या ठिकाणी असं भव्य स्मारक उभारू की ताजमहलपेक्षाही जास्त लोक त्याला भेट देतील, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
असं जर झालं नाही तर नाव बदलतो असंही ते म्हणाले. आग्र्यातील किल्ल्यावर यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, अभिनेता विकी कौशलही उपस्थित होतो. या कार्यक्रमात अभिनेता विकी कौशलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा देवाभाऊ असा उल्लेख केला तर आग्र्यात जेथे छत्रपती शिवरायांना बंदी ठेवण्यात आले होते तेथे शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधणार
आग्र्यातील कोठी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी बनवण्यात आलं होतं. ती कोटी आज मीना बाजार या नावाने ओळखली जाते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “योगीजींना विनंती करून ही जागा महाराष्ट्र शासन अधिग्रहीत करेल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे स्मारक उभारणार. हे स्मारक इतकं सुंदर असेल की ताजमहलपेक्षा जास्त लोक या ठिकाणी भेट देतील. असं झालं नाही तर देवेंद्र फडणवीस हे नाव लावणार नाही.”
औरंगजेब आमचा पूर्वज होऊ शकत नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संभाजीराजे यांच्यावर अन्याय झाला आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास मोगलांनी समोर येऊ दिला नाही. संभाजीराजे यांचा खरा इतिहास विकी कौशल यांनी समोर आणला. त्यांचे आभार मानतो. शिवाजी महाराज यांचे मावळे जातीसाठी, धर्मासाठी लढायचे. ते कधी थकत नव्हते, वेतनासाठी ते काम करत नव्हते. जिथे औरंगजेबची कबर आहे त्या औरंगाबादचं नाव आम्ही छत्रपती संभाजीनगर केलं. औरंगजेबने त्याच्या वडिलांना देखील मारले. औरंगजेब आमचा पूर्वज होऊ शकत नाही.”
विकी कौशलकडून फडणवीसांचे आभार
देवेंद्र फडणवीसांचे आभार विकी कौशल यांने त्यांचे आभार मानले. त्यांना महाराष्ट्राचा लाडका देवाभाऊ असे म्हणतात असं म्हणत विकी कौशलने देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलं. शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे धाडस आणि विचारधारा ही येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयात अखंडपणे राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहनही विकी कौशलने केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 20-02-2025
