गुहागर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशिल शिवलकर व अधिव्याख्याता दीपा सावंत यांनी भेट दिली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे, तज्ज्ञ मार्गदर्शक व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण पार पडले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी प्रशिक्षण केंद्रांना भेटी दिल्या व प्रशिक्षणार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी शिवलकर यांनी क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया मूल्यांकन कार्य नीती राज्य अभ्यासक्रम आराखडा याबाबत विवेचन केले. जागतिक स्तरावर नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 20/Feb/2025
