मी धक्का पुरुष झालोय, असे कोण किती धक्के देतं ते बघूया : उद्धव ठाकरे

मुंबई : “जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केल जातं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्यावर धक्के… आता मी धक्का पुरुष झालोय.. असे कोण किती धक्के देतंय ते बघूया…यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का ज्यावेळी असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नये”, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. कलीना मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.

सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच..सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे… लढाई एकट्या दुखण्याची नाही ही लढाई आपली आहे… सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा जे जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत… डोळे उघडून सर्वांनी हा पिक्चर बघा.. ही गोष्टी ज्या बोलायच्या आहेत ते मराठी भाषा दिनानिमित्त सभागृहात बोलेन..

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागण्याची दाट शक्यता – उद्धव ठाकरे

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लढाई आपल्या एकट्याची नाही. आपल्या मुळावर ती घाव घालणारे असे सरसावले. आपल्याच लाकडाचा दांडा करून कुदळ करून शिवसेनेच मराठी माणसाच्या मुळावर ती घाव घालण्याचे काम करतायत. त्यासाठी आपण एक राहिलो पाहिजे. संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत… सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. 227 किंवा 236 चा निकाल लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे… मग सर्वांना दिलेले ती काम सर्वांनी करा शाखेनुसार काम करा..विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही.

काही दिवसांपूर्वी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर कोकणात देखील अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सातत्याने धक्के बसत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना धक्क्यांविषयी भाष्य केलंय. शिवाय, महापालिका निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचाही प्रयत्न केलाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 20-02-2025