चिपळूण : अल्पसंख्याक बहुल शासनमान्यप्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी आता २ ऐवजी १० लाखांचे अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील ३२ शाळांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
भारत सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने अल्पसंख्याक समुदायासाठी पंतप्रधानांचा १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. या योजनेच्या १५ उद्दिष्टांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे, अल्पसंख्याक समुदायाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी उपाययोजना करणे, अशा स्वरूपाची उद्दिष्टे निश्चित केली आहे. अल्पसंख्याक समुदायास केंद्र शासनाच्या इतर विविध कल्याणकारी योजनांचा, जसे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्यांक शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, शाळेत विद्युत व्यवस्थेअभावी शिक्षणात खंड पडू नये म्हणून जनरेटरची सुविधा निर्माण करणे या योजनांचासुद्धा समावेश करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 21/Feb/2025
