लांजा : तालुक्यातील ग्रामविकास मंडळ खेरवसेच्या वतीने मंगळवार दि. २५ ते गुरुवार २७ फेब्रुवारी या कालावधीत श्री स्वयंभू शंकर देवालयाचा महाशिवरात्र उत्सव व वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
ग्रामविकास मंडळ खेरवसेच्या वतीने सलग १६ व्या वर्षी हा स्वयंभू शंकर देवालयाचा महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. दिनांक २५ रोजी सकाळी सात वाजता पूजा पाठ, नऊ वाजता पालखीला रुपये लावणे, बारा वाजता पूजा पाठ व आरती, ३ ते सायंकाळी ६ हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ७ ते रात्री ९ भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतील तर रात्री १०.३० वाजता गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी पूजा पाठ, ९ वाजता स्वयंभू शंकराला महा अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती व भजन त्यानंतर सायंकाळी ७ ते ९ हरिपाठ व १० वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा आणि रात्री ११ वाजता बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पूजा पाठ, ९ वाजता आरती, ९ते दुपारी १२ वाजता भजन आणि किर्तन असे कार्यक्रम होतील. दुपारी १ ते दुपारी ३ महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८.३० ते १० वाजता भजन आणि रात्री १० वाजता ऑर्किस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.
अशाप्रकारे या उत्सवाचे मंडळाचे हे सलग १६ वे वर्ष असल्याने या उत्सवाला भक्तांच्या आणि भाविकांच्या, ग्रामस्थांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिराभोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार असून मंदिर परिसर यामुळे रोषणाईने उजळून निघणार आहे या स्वयंभू शंकर देवालय शिवरात्री उत्सवासाठी ग्रामविकास मंडळ खेरवसेचे सर्व पदाधिकारी, गाव प्रमुख आणि ग्रामस्थ हे मेहनत घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 22/Feb/2025
