सराईत गुन्हेगार दिगंबर सुर्वे याला सश्रम कारावासाची शिक्षा

चिपळूण : सावर्डे मधील सराईत गुन्हेगार आरोपी दिगंबर सुनील सुर्वे (वय-31वर्षे, रा. सावर्डे काजरकोंड ता.चिपळूण, जि.रत्नागिरी) यास चोरीच्या गुन्ह्यात कोर्टाने आयपीसी 457 अन्वये 2 वर्षे सश्रम कारावास व 5000 रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चिपळूण येथील दिवाणी न्यायाधीश श्री. मयुरेश काळे यांनी सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.- 41/2022, आयपीसी 454,457, 380 मधील चोरीच्या गुन्ह्यात कोर्टाने आयपीसी 457 अन्वये 01 वर्षे सश्रम कारावास व 2500 रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची कैद, आयपीसी 380 अन्वये 01 वर्षे सश्रम कारावास व 2500 रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची कैद अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अर्जुन गमरे यांनी केला असून प्रभारी अधिकारी स. पो. नि. आबासो पाटील व सदर शिक्षकामी सरकारी वकील सुरेखा पाटील यांनी काम पाहिले व पैरवी कामकाजाचे पो.ना. मिनाद कांबळे यांनी केले आहे. निकाला नंतर आरोपी दिगंबर सुर्वे याला जिल्हा विशेष कारागृहात ठेवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 22-02-2025