गुहागर : भातगावात वाळू कामगारांना मारहाण

गुहागर : तालुक्यातील भातगाव येथील शासकीय वाळू डेपोवरील ३ कामगारांना ते झोपेत असताना त्यांच्या खोलीत प्रवेश करून चौघांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी घडली. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी विराज कदम (३२, भातगाव, तिसंग) याला शनिवारी अटक केली असून, पसार झालेल्या तिघांचा शोध सुरू आहे.

वाळू व्यवहारातील रकमेवरून वाद झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. भातगाव तिसंग येथील शासकीय वाळू डेपोवरील क्रेन ऑपरेटर मोहन गणपत महतो (४३), निलकंठ महतो, धनु महतो हे तिघे कामगार असून १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास भातगाव तिसंग येथील खोलीवर जेवण करून झोपले होते. रात्री १ च्या सुमारास या तिघाजणांना चौघा आरोपींनी येऊन दांडक्याने मारहाण करत जखमी करून काळोखात पसार झाले.

या तीनही कामगारांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात त्या ४ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयितांपैकी विराज कदम याला २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 24/Feb/2025