दापोली : काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे, असे मत महाराष्ट्र भाजपाचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ यांनी व्यक्त केले. दापोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष केदार साठे, तालुका अध्यक्ष संजय सावंत, प्रदेश निमंत्रित सदस्य स्मिता जावकर, शहर अध्यक्ष संदीप केळकर, सोशल मीडिया तालुका संयोजक धीरज पटेल, नगरसेविका जया साळवी आदी उपस्थित होते.
हा अर्थसंकल्प सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणारा, देशाच्या विकासाला चालना देणारा, भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास ही अवधूत वाघ यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वाची पावले उचलली आहेत. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवा शिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यातून तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आहे, असेही वाघ म्हणाले, तर पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना, मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ, फळ-भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, युरिया आत्मनिर्भरता योजना यांसारख्या महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील, असे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 24/Feb/2025
