संगमेश्वर : बुरंबी येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथे शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० ला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र हे प्रशिक्षण सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील हे प्रशिक्षण गट शिक्षण अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बुरंबी येथील प्रशिक्षणात सुमारे ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. केंद्रप्रमुख दिलीप जाधव यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. या प्रशिक्षणात प्राथमिक विभागात सुलभक म्हणून संतोष जाधव, संतोष चव्हाण, रवी कदम, आदम सय्यद, संजय बांडागळे, सोमनाथ सराटे, आदी तर ६ वी ते १२ या गटासाठी रघुनाथ फोंडके, प्रशांत सनगरे, सुरज जाधव, सुहास गेल्ये, भाग्यदेवी चौगले आदी काम पाहत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दि. १७ ते २२ फेब्रुवारी असे झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण २४ फेब्रुवारी ते १ मार्च असे होणार आहे.

बुरंबी येथील प्रशिक्षण सुलभ होण्यासाठी केंद्रप्रमुख दीपक यादव, भास्कर जंगम, दिगंबर सुर्वे, दिलीप जाधव, राज्य समन्वयक, दत्ताराम गोताड तसेच गट साधन संगमेश्वरचे अमोल कांबळे, कलाश्री मोहिते, गिरीजा होतेकर आदी मेहनत घेत आहेत. प्रशिक्षणा दरम्यान सुलभक, नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सखोल मार्गदर्शन करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 24/Feb/2025